सामर्थ्य आणि कौर्य ज्या ठिकाणी एकवटले असेल अशांच्या तावडीत सापडलेल्या असाहाय्य, दुर्बल व्यक्तीचे जिणे तेंडुलकरांनी या नाटकातून भेदकपणे मांडले आहे. 'गिधाडे' प्रमाणेच या नाटकातील व्यक्तिरेखा परिस्थितीपुढे अगतिक आहेत. भयानक वास्तवाचे दर्शन घडवणारे हे नाटक एका अनिश्चित शेवटावर प्रेक्षक-वाचकांना बधीर करणारा अनुभव देते आणि एकप्रकारचे सुन्नपणा मनात भरून राहते.