या पुस्तकाच्या रूपानं दुःखाचे सगळे चेहरे वाचकांसमोर साकार होत आहेत. निर्भय होवून जर दुःखाचं संपूर्ण दर्शन घेतलं तर दुःखाचा भाऊ असलेल्या सुखापासूनही माणूस मुक्त होतो. दुःख ही केवळ एक परिकल्पना, भ्रम आहे हे वास्तव या पुस्तकात प्रस्तुत केलं आहे. आपण जर स्वतःला दुःखी बनवू शकतो तर निश्]चितच आनंदीही बनवू शकणार नाही का? दुःखमुक्ती-मंत्र प्राप्त करून दुःखद घटनांमध्येही खुश राहण्याची कला आपण या पुस्तकाद्वारे शिकू शकाल. दुःख हे केवळ शंका नसून मनन संदेश आहे हे गहन रहस्य या पुस्तकातून जाणून माणूस एक परिपूर्ण जीवन जगू शकतो. वर्तमान जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंदही तो लुटू शकतो. हे पुस्तक पुनःपुन्हा वाचून सुख-दुःखात माणसानं निष्णात व्हावं हा यामागचा उद्देश.