आत्मविश्वासाच्या शिखरावर "व्यक्तिमत्त्व विकास' हा आजच्या जगातला परवलीचा शब्द! पण व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे केवळ बाह्यविकास नसून "आत्मविकास' हीच त्याची पहिली पायरी आहे. आत्मविकास साधण्यासाठी अनिवार्य असणारा गुण म्हणजे "आत्मविश्वास'. प्रस्तुत पुस्तक केवळ विद्यार्थ्यांसाठी किंवा आत्मविश्वासाचा अभाव असणाऱ्यांसाठी लिहिलं नसून, विश्वातल्या प्रत्येक मनुष्यासाठी या पुस्तकाची निर्मिती करण्यात आलीय. विद्यार्थी, शिक्षक आणि गृहिणी यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत आणि आजच्या युवापिढीपासून ते आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणाऱ्या साधकांपर्यंत सर्वांसाठी हे पुस्तक म्हणजे यशाचा पासवर्डच! या पुस्तकात वाचा - आत्मविश्वास म्हणजे काय? आपली खरी ओळख काय? आत्मविश्वास प्राप्त करण्याच्या मार्गातील अडथळ्यांवर मात कशी करावी? विश्वासाच्या शक्तीने जग कसं जिंकाल? विश्वातील कोणतंही कठीण काम पूर्ण करण्याचा आत्मविश्वास कसा प्राप्त करावा? आत्मविश्वास आणि अहंकार यात फरक काय? विचारांना आणि भावनांना दिशा कशी द्यावी? संकल्पशक्ती, एकाग्रता आणि वर्तमानात जगण्याची कला आत्मसात कशी कराल?