आपला इमोशनल क्वोशंट-एट- किती आहे? वरील प्रश्न आपल्याला कोणी विचारलाय का? कारण आज सर्वांनाच आय.क्यू.चं महत्त्व जरी समजलं असेल, तरी इ.क्यू.चं इमोशनल क्वोेशंटचं महत्त्व त्याहीपेक्षा जास्त आहे, हे खूप कमी लोक जाणतात. भावनांशी संघर्ष करणार्या मनुष्याकडे जर 'इ.क्यू.' असेल, तर जीवनात येणार्या बाधा, समस्यांशी समर्थपणे तो सामना करू शकतो. परंतु त्याच्याकडे केवळ आय.क्यू असेल आणि इ.क्यू. नसेल, तर त्याला प्रत्येक कार्य कठीण वाटेल. यासाठीच भावनिक परिपक्वता प्राप्त करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मनुष्य केवळ वयाने मोठा झाला म्हणून तो परिपक्व बनत नाही, तर भावनांमुळे विचलित न झाल्याने, निर्धाराने त्यांचा सामना करून, योग्य रीतीने त्यांच्याकडे पाहण्याची कला शिकूनच तो परिपक्व बनतो. प्रस्तुत पुस्तकाद्वारे हीच परिपक्वता आपल्याला प्राप्त होईल. मनुष्य भावनांतून मुक्त होण्याचे दोनच मार्ग अवलंबतो. पहिला- भावना दाबून ठेवणे आणि दुसरा, भावनांमुळे निर्माण झालेला प्रक्षोभ इतरांवर बरसणे. मात्र वरील दोन पद्धतींशिवाय आणखी काही अचूक आणि परिणामकारक पद्धती या पुस्तकात उद्धृत करण्यात आल्या आहेत. त्यांचा अवलंब करून भावनांच्या जंजाळातून