गीता यज्ञ - कर्मफळ आणि सफळ फळ रहस्य जीवनरूपी युद्ध जिंकण्याचं रहस्य उलगडणारी- 'मास्टर की' 'आता तर या सर्व गोष्टींसाठी मला अजिबात वेळ नाही... दिसत नाही का, मी किती बिझी आहे... माझ्यावर केवढ्या जबाबदार्]या आहेत... त्यासाठी मला किती संघर्ष करावा लागतोय...' अशा प्रकारे संसारचक्रात अडकलेल्या धावपळीच्या या स्पर्धेच्या युगात तणावपूर्ण आयुष्य जगत असलेल्या मनुष्याला, अध्यात्म आणि मुक्तीविषयी सांगितलं, तर त्याच्याकडून याखेरीज आणखी काय ऐकण्याची अपेक्षा कराल? तरीही त्याला नेटानं सांगितलं, 'बाबा रे, एक अशी युक्ती आहे, ज्यायोगे तुझे संघर्ष, समस्या, संपुष्टात येतील, तू सर्व जबाबदार्]या सहजतेनं, आनंदानं पूर्ण करशील. किंबहुना त्यांचं तुला ओझंही वाटणार नाही. शिवाय समाधान मिळवण्यासाठी इतरत्र कुठेही जावं लागणार नाही.' तेव्हा तो काय म्हणेल? 'अरे मला लवकर सांगा, अशी कोणती मास्टर की, युक्ती आहे, जी माझ्या समस्यारूपी कुलपाची चावी उघडू शकते?' 'होय, ' अशीच विलक्षण, अद्भुत 'मास्टर की' घेऊन प्रस्तुत 'गीता यज्ञ' आपल्या सेवेस तत्पर आहे. ज्यात आपण शिकणार आहोत- *हसत खेळत सहज, सफल जीवन कसं जगाल? *कर्म करण्याची योग्य पद्धत काय? *संसारात राहून, आपल्या जबाबदार्]या