चिंता म्हणजे चिता
चिंता नव्हे, चिंतन करा"चिंता' आणि "चिता'... या दोन शब्दांत फरक आहे, तो केवळ एका अनुस्वाराचा! मनुष्याच्या मनात दाटलेलं चिंतेचं मळभ आनंदरूपी सूर्याला झाकोळून टाकतं. चिंता मनुष्याचं केवळ मानसिक संतुलनच बिघडवत नाही, तर ती त्याच्या मृत्यूचं म्हणजेच चितेचं कारण देखील ठरू शकते. शिवाय, शरीर-स्वास्थ्यावरही चिंतेचे दुष्परिणाम जाणवतात. इतकंच काय, तर नातेसंबंधात कटुता येण्यामागील एक मुख्य कारण म्हणजे चिंता होय. चिंता एखाद्या वाळवीप्रमाणे मनुष्याच्या आयुष्याला पोखरते. म्हणूनच चिंता करण्यापेक्षा चिंतन करणं कधीही श्रेयस्कर!
प्रस्तुत पुस्तकातील चिंतामुक्तीचे उपाय अत्यंत साधे, सरळ आणि तितकेच परिणामकारक आहेत. तेव्हा चिंता करणं सोडून द्या आणि या पुस्तकासोबत मनन-चिंतन सुरू करा. मग तुमच्या आयुष्यात केवळ आणि केवळ आनंदाची बहार येईल.